१. सर्व शैक्षणिक, प्रशासकीय विभागप्रमुख यांना त्यांचा आय डी, पासवर्ड एस.एम.एस. द्वारे कळविण्यात आला आहे. जर एस.एम.एस. आला नसल्यास युनिक विभागाशी संपर्क साधावा.
२. आपणास मिळालेल्या आय.डी. व पासवर्ड द्वारे दिलेल्या संकेतस्थळावर लॉगीन करावे.
३. लॉगीन केल्यावर सर्वप्रथम दिलेल्या लिंक चा वापर करून आपला पासवर्ड बदल करावा
४. तसेच आपला मोबाईल नंबर व ईमेल पत्ता अद्यावत करावा जेणेकरून आपल्याला प्रणाली संबंधीच्या तसेच इतर प्रशासकीय सूचना मिळत राहतील. सदर दोन्ही बाबी अपडेट केल्यानंतरच इतर मेनू कार्यान्वित होतील. लॉग आउट करून पुन्हा लॉगीन करावे व नवीन पासवर्ड ची पडताळणी करावी.
५. लॉगीन केल्यावर System/ Dept Users या मेनू ऑप्शन मध्ये जाऊन आपल्या विभागातील सर्व कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश झाल्याची खात्री करावी, काही दुरुस्ती असल्यास त्यासंबंधीचा ईमेल युनिक विभागाला करावा व युनिक विभागाकडून ती दुरुस्त करण्यात येवून ती अपडेट झाल्याची खातरजमा करावी.
६. सदर मेनू ऑप्शन मधून आपल्या विभागातील सर्व कर्मचार्यांना त्यांचा आयडी व पासवर्ड प्रदान करण्यात येऊन त्याची नोंद घ्यावी व सदर पासवर्ड लॉगीन करून तो बदल केल्याशिवाय (मुद्दा. क्र. ३ व ४ नुसार बाबी अपडेट कराव्यात) सदर संगणक प्रणालीचा वापर करता येणार नाही याची कल्पना द्यावी.
Detailed Manual for using the sytem will be available soon..